7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जन्मलेल्या अपत्याला पेन्शन मिळणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी असे काही नियम आहेत, ज्याबाबत फार कमी जणांना माहिती आहे.   

Updated: Dec 11, 2021, 10:17 PM IST
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जन्मलेल्या अपत्याला पेन्शन मिळणार?  title=

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी असे काही नियम आहेत, ज्याबाबत फार कमी जणांना माहिती आहे. एखाद्या पेचप्रसंगावेळी निवृत्ती वेतनाचे नियम काय असतात, नक्की अटी आणि शर्थी काय असतात, या बाबतची माहिती निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग दिली आहे. यानुसार संबंधित विभागाने तब्बल 75 महत्त्वाच्या नियमांबाबत माहिती दिली आहे. या 75 पैकी एक असा महत्तवपूर्ण नियम आहे, ज्याबाबत तुम्हाला माहिती असायलाच हवी. (Will a child born after the death of a government employee is also entitled to pension know about rules)
 
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जर त्याच्या मुलाचं जन्म झाल्यास त्याला निवृत्ती वेतन मिळणार का, असा हा पेचात्मक प्रश्न आहे. याबाबत संबंधित विभागाने माहिती दिली आहे.  

नियम काय सांगतो? 

देण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जन्मलेल्या अपत्यही कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र असतं. जर निवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जन्मलेलं मुलही कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरेल. थोडक्यात काय तर नोकरी करताना किंवा निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्याच्या अपत्य जन्मल्यास त्याला निवृत्ती वेतन मिळेल.   

असा करा अर्ज

कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती सरकारने दिली आहे.  

नोकरी करत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी मृत्यू प्रमाणापत्र हे संबंधित विभागात जमा करावं लागेल. यानंतर निवृत्ती वेतनाची प्रक्रिया पूर्ण होईल. 

अल्पवयीन तसेच मतिमंद (Special Child) अपत्याबाबत त्याचे पालक हा दावा  करू शकतात.

सरकारी कर्मचाऱ्याला उत्तराधिकारी ठेवायला सांगितल्यास तो कर्मचारी त्याच्या अपत्यासाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनाचा दावा सादर करू शकतो.