वडिलांच्या जयंतीच्या दिवशी ज्योतिरादित्य सिंधिया घेणार मोठा निर्णय ?

माधवराव सिंधियांची आज जयंती

Updated: Mar 10, 2020, 11:02 AM IST
वडिलांच्या जयंतीच्या दिवशी ज्योतिरादित्य सिंधिया घेणार मोठा निर्णय ?  title=

भोपाळ : मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मध्ये कमलनाथ सरकारच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता साऱ्यांच्या नजरा या ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे वळल्या आहेत. आता ज्योतिरादित्य सिंधिया काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे 17 समर्थक आमदार हे बंगलुरूत आहेत. मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार वाचणार की नवीन सरकार सत्तेत येणार याचा निर्णय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर अवलंबून आहे. ('...म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस नेत्यांना भेटले नाहीत') 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया जर काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत नाहीत. तर काँग्रेस त्यांना राज्यसभेत अपक्ष खासदार म्हणून पाठवू शकतात. तसेच सुत्रांकडून देखील अशी माहिती मिळाली आहे की,'भाजपने देखील त्यांना राज्यसभेत जाण्यासोबतच कॅबिनेट मंत्री बनण्याची ऑफर दिली आहे.' त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की,'ज्योतिरादित्य माधवराव सिंधियांच्या जयंतीनिमित्त वडिलांप्रमाणेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेणार का?' ज्योतिरादित्य आपल्या वडिलांप्रमाणेच वेगळा पक्ष निर्माण करण्याची चूक करणार नाहीत. (काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?) 

1993 मध्ये माधवराव सिंधियांनी घेतला होता महत्वाचा निर्णय 

ज्याप्रमाणे मध्यप्रदेशात काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर नाराज होऊन ज्योतिरादित्य सिंधिया पक्ष सोडू शकतात. अगदी त्याचप्रमाणे 19993 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडिल माधवराव सिंधिया दिग्विजय सिंह सरकारपासून वेगळे झाले होते. माधवरावांनी पक्षात उपेक्षा होत असल्याचं कारण देत काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेशात विकास काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा काँग्रेसकडे गेले.