उष्णता इतकी की, महिलेने कारच्या बोनेटवर भाजली चपाती, Video पाहून सगळेच हैराण

देशातील बहुतांश भागात सध्या कडक ऊन पडत आहे. काही ठिकाणी पारा 40 अंशांच्याही पुढे गेला आहे.

Updated: Apr 30, 2022, 07:55 PM IST
उष्णता इतकी की, महिलेने कारच्या बोनेटवर भाजली चपाती, Video पाहून सगळेच हैराण title=

Viral Video : उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागात सध्या कडक ऊन पडत आहे. काही ठिकाणी पारा 40 अंशांच्याही पुढे गेला आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ओरिसामध्ये देखील कडक उन्हाचा तडाखा बसत आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला उन्हात उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर भाकरी भाजताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा ही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. महिला गाडीच्या बोनेटवर भाकरी भाजत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओडिसात कडक ऊन

सध्या उष्णतेमुळे ओडिसातील परिस्थिती खूपच बिकट आहे. उष्णतेमुळे महाविद्यालयाचे वर्ग २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहेत. राज्याच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ओडिसातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा सुरू आहे. कटक, सुबर्णपूर आणि खुर्दा जिल्ह्यात एवढी उष्णता आहे की लोकांनी सकाळपासून घराबाहेर पडणे बंद केले आहे. कमाल तापमानात दररोज तीन अंशांची वाढ होत आहे.