आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Updated: Mar 5, 2022, 08:30 PM IST
आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला? title=

मुंबई : आई ही आई असते, तिच्या प्रेमाची तुलना कशासोबतही करता येणार नाही. आई आपल्या मुलांसाठी जे करते ते या जगात त्याच्यासाठी कोणीही करणार नाही. आपल्या बाळाला जराजरी त्रास झाला तरी आईच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. आपल्या मुलासाठी ती नेहमीच एका योद्धा सारखी उभी असते. मग आपल्या मुलाला खरंच आईची गरज असल्यावर ती कशी बरी मागे राहिल आणि याच गोष्टीचं उदाहरण एका आईनं जगासमोर ठेवलं आहे. कोरोना महामारी दरम्यान एक महिला प्रसिद्धीच्या झोतात आली. जिने लॉकडाऊनच्या काळात 1400 किमी प्रवास करुन आपल्या मुलाचे प्राण वाचवले. परंतु आता पुन्हा एकदा या आईचा मुलगा मोठ्या संकटात सापडला आहे आणि आता हा प्रवास फार मोठा आहे, त्यामुळे ही आई आपल्या मुलाला कसं वाचवणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि धोकादायक ही आहे. कारण या महिलेचा मुलगा तिच्यापासून आता 5 हजार 235 किलोमीटर लांब आहे.

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या रझिया बेगम आता आपल्या मुलाच्या विरहामुळे चिंतेत आहेत. त्यांची इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

मुलगा एमबीबीएस करत आहे
निजामुद्दीन हा युक्रेनच्या सुमी शहरात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. सुमी हे रशियन सीमेजवळ आहे आणि बहुतेक भारतीय विद्यार्थी सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे आहेत. युक्रेनमधून आलेल्या बातम्यांमुळे रझिया खूपच घाबरली आहे. विशेष म्हणजे रशियन सैन्याच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या बातम्यांनी तिला घबरुन सोडलं आहे.

आईने पीएम-मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली
रझिया बेगम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, राज्याचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांना रशिया आणि युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थीतीत त्यांच्या मुलाचे आणि इतर भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.

या आईने गुरुवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, निजामुद्दीन अमान हा बंकरमध्ये बंद आहेत आणि ती त्यांच्याशी फोनवर बोलू शकत आहे.

त्याने मला कॉल करुन सांगितले की, "त्याची माहिती देण्यासाठी त्याने मला कॉल केला आणि सांगितले की, तो आता ठीक आहे, त्याची काळजी करण्याची गरज नाही, परंतु तो सध्या राहत असलेल्या ठिकाणचे वाहतूक कनेक्शन तोडले आहे. असे त्याने मला सांगितले."

मग खडतर प्रवास पूर्ण झाला
दोन वर्षांपूर्वी, कोरोना लॉकडाऊन लागू झाल्यानंतर शेजारच्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात अडकलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी रझिया बेगमने दीर्घ आणि खडतर प्रवास केला. स्थानिक पोलिसांच्या परवानगीने ती एकटीच नेल्लोरला गेली होती आणि तेथून ती आपल्या मुलाला घेऊन परतली होती.

एका अंदाजानुसार, रझियाने स्कूटरने 1400 किमीचा प्रवास केला होता. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, कारण आता इच्छा असूनही ती आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी जाऊ शकत नाहीय.