अश्लिल व्हिडिओ बनवत धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले; महिलेवर भयानक अत्याचार

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. 

Updated: Jun 22, 2023, 08:59 PM IST
अश्लिल व्हिडिओ बनवत धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले; महिलेवर भयानक अत्याचार  title=

Madhya Pradesh Crime News : धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. महिलेवर अत्याचार होत असताना सोबत प्रवास करणाऱ्या नातेवाईकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध करणाऱ्या पीडित महिलेच्या नातेवाईकाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. हा कोणत्या चित्रपटाचा सीन नाही तर अशी घटना मध्य प्रदेशात प्रत्यक्षात घडली आहे. मुजफ्फरपुर सूरत एक्सप्रेस ट्रेनमध्ये (Muzaffarpur Surat Express Train) ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय घडल नेमकं?

पीडित महिला तिच्या एका नातेवाईकासह  मुजफ्फरपुर सूरत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे.  मोल मजुरी करणारी ही महिला तिच्या नातेवाईकासह गुजरात येथे काम करण्यासाठी निघाली होती. मुजफ्फरपुर सूरत एक्सप्रेसने ती प्रवास करत होती. मध्य प्रदेशील ग्वालियर येथील बिलौआ पोलिस ठाण्याच्या हद्दीत या महिलेवर अत्याचार झाला आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने या महिलेची छेड काढली. या महिल्या अंगावरचे कपडे फाडून तिच्यावर अत्याचार केला. आरोपींनी महेलेचा अश्लिल व्हिडिओ देखील बनवला. महिलेच्या तक्रारीनुसार पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धावत्या ट्रेनमधून बाहरे फेकले

आरोपी महिलेवर अत्याचार करत होते. महिला आणि तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या नातेवाईकाने याला विरोध केला.आरोपींनी या दोघांना मारहाण करत त्यांना धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. ट्रेनमधून पडल्याने दोघेही गंभीर झाले. जखमी अवस्थेत ते रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या एका गावात पोहचले. ग्रामस्थांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.