फ्रीज नसतानाही पाणी थंड ठेवण्यासाठी महिलेने शोधला जुगाड; Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

Chill Water Without Refrigerator: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक महिला विना फ्रीज पाणी थंड कसं ठेवता येईल, याची माहिती देत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2024, 01:50 PM IST
फ्रीज नसतानाही पाणी थंड ठेवण्यासाठी महिलेने शोधला जुगाड; Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है! title=
Woman Shows Desi Jugaad To Chill Water Without Refrigerator video goes viral

Chill Water Without Refrigerator: सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती घेऊ शकता. व्हायरल व्हिडिओमुळं अनेक नव नवीन विषयांची माहिती कळते. इन्स्टाग्रामवर सध्या भारतातील एका गावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत विना फ्रीज किंवा वीजेच्या न वापर करता पाणी थंड करण्याची सोप्पा आयडिया दाखवली आहे. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. दिव्या सिन्हा नावाच्या तरुणीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

दिव्या सिन्हा हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. गावातील रहिवाशांच्या जगण्याच्या पद्धती आणि त्यांनी समस्यांवर शोधलेला तोडगे याबद्दल तिने या व्हिडिओत सांगितले आहेत. तसंच, ती पुढे म्हणते की, पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. मात्र, दिव्याने तिच्या गावातच एक साध्या प्लास्टिकच्या बॉटललाच फ्रीज बनवले आहे. पाणी नेहमी थंड राहिल अशा पद्धतीने तिने बॉटल बनवली आहे. तिने व्हिडिओत या बॉटलची झलक देखील दाखवली आहे. ओल्या कपडात गुंडाळलेली बॉटल एका झाडाला लटकवलेली आहे. 

दिव्या सिंहने पुढे म्हटलं आहे की, 10 ते 15 मिनिटातंच या बॉटलमधील पाणी थंड होईल. जेव्हा बॉटल ओल्या कापडात गुंडाळून हवेच्या संपर्कात येईल अशा पद्धतीने ठेवल्यास बॉटलच्या आतले पाणी आपोआप थंड होते. कपड्याच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि बॉटलमधील पाण्यातील उष्णता खेचून घेते. पुढे दिव्याने म्हटलं आहे की, गावातील लोक असेच बुद्धिमान असतात. तिने त्याच्या या स्मार्ट हॅकचे श्रेय तिच्या लहान भावाला दिलं आहे. तर, अनेकांना तिचा हा वॉटर कुलिंग हॅक खूप जास्त आवडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिचं खूप कौतुक करण्यात येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divya Sinha (@divyasinha266)

एका युझरने म्हटलं आहे की, खूप छान दीदी तुम्ही कोणत्याही समस्येवर मोठ्या आनंदाने तोडगा काढता. याच कारणामुळं गावातील लोक अद्भूत असतात. तर, एकाने म्हटलं की हे किती इको फ्रेंडली आहे. एका इन्स्टाग्राम युजरने म्हटलं आहे की, दीदी मे जेव्हा दिल्लीला राहायचो आणि तेव्हा माझ्याकडे फ्रीज नसायचा तेव्हा ही याच प्रकारे पाणी थंड करायचो. मी गावात राहत नाही पण गावातील लोक आणि तिथलं वातावरण आणि लोकांचे मला खूप कौतुक आहे.