हे आहे देसी टॅलेंट, पहाल तर पोटभर हसाल

या बातमीतील व्हिडिओतही तुम्हला जे टॅलेंट पहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हीही अवाक व्हाल.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 24, 2018, 01:11 PM IST
हे आहे देसी टॅलेंट, पहाल तर पोटभर हसाल title=

मुंबई : आपल्या देशात टॅलेंटची मुळीच कमतरता नाही. अनेक लोकांकडे अनेक प्रकारचे टॅलेंट असते. फरक इतकाच की काहिंची दखल घेतली जाते काहींची नाही. ज्याची घेतली जाते त्यांची चर्चा होते. ज्याची घेतली जात नाही, ते आपापल्या परीने टॅलेंटचा वापर करण्याच प्रयत्न करतात. या बातमीतील व्हिडिओतही तुम्हला अशाच काही लोकांचे टॅलेंट पहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हीही अवाक व्हाल.

भिंतीवर शोणाच्या गोवऱ्या

पहिला व्हिडिओ आहे भारतातील ग्राम्य जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या एका महिलेचे. ही महिला एका भिंतीवर शोणाच्या गोवऱ्या थापताना दिसते आहे. गोवऱ्या थापणे हे अनेक महिलांसाठी दैनंदिन काम. पण, या व्हिडिओतील महिला ज्या पद्धतीने हे काम करताना दिसते आहे. ते पाहून ते तिचे टॅलेंटच आहे, असेच वाटते.

गाण्याच्या तालावर नाच 

दुसरा व्हिडिओ बहुदा एका विवाह प्रसंगातील असावा. या व्हिडिओत एक महिला गाण्याच्या तालावर नाचताना दिसते आहे. अर्थात गाण्यावर नृत्य करणे यात विशेष असे काही नाही. तरीही ही महिला ज्या पद्धतीने नाचताना दिसते आहे, ती पद्धत मात्र फारच मजेशीर आहे. बातमीतील दोन्ही व्हिडिओची झी २४ तास पुष्टी करत नाही. मात्र, दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे त्याची दखल घेण्यात आली आहे, इतकेच.