Yusuf Pathan TMC: माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेस पक्षाकडून युसुफला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. बहरामपूर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच मतदारसंघातून काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांना उमेदवारी देऊ शकतं. त्यामुळं 2024च्या लोकसभेत या दोन्ही दिग्गज उमेदवारांचा सामना होणार आहे.
यूसुफ पठाण लोकसभा लढवणार असल्याची जाहिर होताच त्याची संपत्ती किती आहे याची चर्चा जोर धरू लागली आहे. या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यूसुफ पठाणची संपत्ती अधीर रंजन चौधरी यांच्यापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. तसंच, सोबत लग्झरी कार, शानदार बंगला आणि अन्य महागड्या वस्तू आहेत. तर, अधीर रंजन यांच्याकडे 2 कोटींचे घर, 40 लाखांची कर्शियल आणि 6 कोटींची नॉन अग्रीकल्चर जमीन आहे.
caknowledge.com ने दिलेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू यूसुफ पठाण याच्याकडे 30 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 248 कोटींची संपत्ती आहे. यूसुफ पठानला सर्वात जास्त कमाई ही क्रिकेटमधूनच येते. वर्षाला त्याची 20 कोटीपेक्षा जास्त कमाई आहे. तर, त्याच्याकडे 6 कोटींपेक्षा अधिक एक लग्जरी बिल्डिंग आहे. इथे तो त्याचा भाऊ इरफान आणि इतर कुटुंबीयांसमवेत राहतो. दोघा भावांनी 2008 मध्ये 2.5 कोटींमध्ये हे घर विकत घेतलं होतं.
यूसुफ पठाण पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहे. 2021मध्ये पठाणने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निर्वृत्ती जाहिर केली होती. टी-20 वर्ल्ड कप 2007 आणि 2011मध्ये 50 ओव्हर वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा हिस्सा होता. युसूफ पठाणने भारतासाठी 57 वनडे मॅच आणि 810 रन काढले होते. तर, 22 टी-20 मॅचमध्ये त्यांनी 236 रन काढले होते. त्यांनी वनडेमध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकदेखील ठोकले होते. युसूफ पठाणचे नावे वनडेमध्ये 33 आणि टी 20 मध्ये 13 विकेट आहेत.
mynetaने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडे एकूण संपत्ती 10,13,15,437 रुपये इतकी आहे. तर 85 लाखांपेक्षा अधिक कर्जदेखील आहे. बँकांमध्ये 17 लाखापेक्षा अधिक डिपॉजिट आहे. एलआयसीमध्ये 10 लाखांची गुंतवणूक आहे. त्याव्यतिरिक्त चौधरी यांच्याकडे 23 लाखांची गाडी व 26 लाखांपेक्षा अधिक दागिने आहेत.