मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आणि फाल्गुनी ब्राम्हभट्ट (Falguni Brahmabhat) यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका अभिनेत्रीनं केलेल्या तक्रारीवरुन आंबोली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय.. दोघींनी पत्रकार परिषद घेऊन तक्रारदार अभिनेत्रीचे अश्लील व्हिडिओ दाखवत अपशब्द वापरले होते.. त्यानुसार दोघींवर विनयभंग (molestation) आणि आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (rakhi sawant marriage)
पत्रकार परिषदेत अभिनेत्रीचा अश्लील व्हिडीओ दाखवणं राखी आणि फाल्गुनीला चांगलचं महागात पडलं आहे. (rakhi sawant husband) राखी चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. पण आता चर्चेत राहण्यासाठी राखीने आणि फाल्गुनी यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीला लक्ष्य केलं आहे. (rakhi sawant adil)
काही दिवसांपूर्वी राखी आणि फाल्गुनी यांनी पत्रकार परिषद घेवून पीडित अभिनेत्रीचे अश्लील व्हिडीओ दाखवत अपशब्द वापरले होते.. त्यामुळे अभिनेत्रीने पोलिसांत धाव घेतली. आता या प्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (rakhi sawant instagram)
एवढंच नाहीतर पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे पुरावे देखील मांडले आहेत. (rakhi sawant real name) आता राखी आणि फाल्गिुनीविरुद्ध बदनामी करणे, विनयभंग, धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अल्याची माहिती समोर येत आहे.