Trending News In Marathi: साखरेचे अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. यामुळं अनेक आजार जडण्याची भीती असते. मात्र, आता बाजारात नवीन साखर आली आहे. याच्या सेवनाने ना कोलेस्ट्रॉल वाढणार ना ब्लडप्रेशर. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही साखर सर्वोत्तम पर्याय ठरु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर याच्या नियमित सेवनाने फॅटी लिव्हरची समस्या कमी होऊ शकते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल शुगर इन्स्टीट्युटने एक नव्या प्रकारची साखर तयार केली आहे. या संस्थेचे डायरेक्टर प्रो. नरेंद्र मोहन यांनी दावा केला आहे की, ही देशातील पहिली जीआय (ग्लायसेमिक इंडेक्स) साखर आहे. सहा वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. लवकरच याचे पेटेंट दाखल करण्यात येईल.
संस्थेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य साखरेच्या तुलनेत या साखरेची किंमत फक्त 20 टक्के जास्त असणार आहे. याचे पेटेंट मिळाल्यानंतर हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी दिले जाईल. त्यांनी म्हटलं आहे की, या साखरेत 19 आययू प्रति ग्रॅम व्हिटॅमिन-ए देखील आहे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लवकरच यामध्ये मॅग्निशियम, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन बी 12 देखील समाविष्ट केले जाईल.
सामान्य साखरेतील जीआय स्तर 68च्या जवळपास असतो. ज्याच्या सेवनानंतर शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यानंतर, स्वादुपिंडातून इन्सुलिन सोडले जाते आणि जीआय पातळी नियंत्रित करते. संस्थेच्या संचालकांनी सांगितले की आम्ही या साखरेचा जीआय 55 पेक्षा कमी केला आहे. त्यासाठी उसाचा रस एका विशिष्ट पद्धतीने शुद्ध केला जातो.
प्रमाणाबाहेर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचे परिणामही शरीरावर होऊ शकतात. सर्वाधिक गोड खाल्यामुळे लठ्ठपणा, हृदयाचा रोग, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जास्त साखर खाल्ल्याने एंड्रोडनता जास्त प्रमाणात स्राव होतो, ज्यामुळे मुरुमे येऊ शकतात. जास्त साखर किंवा मिठाईचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. कारण बहुतेक साखरयुक्त पदार्थांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. साखरेचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होतो