Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्य ज्यांनी आणलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी तारखेनुसार जयंती आहे. पण तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर हा वाद नेमका काय?

Updated: Feb 19, 2024, 07:45 AM IST
Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते? title=

हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. देशभरात रयतेच्या राजाचा जन्मदिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवप्रेमी आपल्या राजाच्या जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात.महाराजाचं या दिवशी गुणगाण गायलं जातं. महाराजांनी शिकवलेली शिकवण लक्षात ठेवली जाते. असं असताना महाराजांची शिवजंयती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते?

दोन वेळा कधी?

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीचा आणि मुघलांचा बिमोड करत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमींकडून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. एक शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यंदा 2024 मध्ये शिवजयंती तिथीनुसार 28 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. पण या दोन शिवजयंतीवरुन शिवप्रेमींमध्ये दोन गट पडले. 

(हे पण वाचा - Shiv Jayanti 2024 : रयतेचा राजा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शेअर करा WhatsApp, HD Image, Status फोटो)

महाराजांचा जन्म नेमका कधी? 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा तिथीनुसार, तृतीयेला झाला आहे. त्यामुळे तिथीनुसार त्यांची जयंती ही 28 मार्च रोजी येते. तर तारखेनुसार आपण याच वर्षी 19 फेब्रुवारीला म्हणजे आज ती साजरी केली. 2000 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत (Vidhasabha Shivaji Maharaj Jayati Proposal) पास झालेल्या प्रस्तावानुसार, शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. परंतु हिंदू पंचांगानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीयेला झाला. तेव्हा शक 1551 होते. तर दुसरीही अशी एक तारीख समोर येते की, वैशाख महिन्यातील द्वितियेला म्हणजे शक 1549 नुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1927 ला झाला होता. यामध्ये अनेकदा मतमतांतरे झाले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे सत्तापालट झाल्यानंतर विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद उठला होता.त्यातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये वादही सुरू झाल. हिंदू पंचांगानुसार शिवरायांची जयंती ही तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार 19 फेब्रुवारीला साजरी करावी यावर धुमसान सुरू झाले होते. मात्र याबाबत कोणताही इतिहास आता बोलू इच्छित नाही. 

(हे पण वाचा - Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीच्या शुभेच्छा... महाराजांचे प्रेरणादायी विचार Whatsapp, Status ला ठेवून साजरी करा शिव जयंती)

नेमका वाद काय?

संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारमध्ये शिवरायांच्या जयंतीच्या वादाचे पडसाद पाहायला मिळतात. 1966 मध्ये इतिहासकारांच्या समवेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची तारीख निश्चित करण्याासाठी सांगण्यात आले होते. यात समितीतून शिवरायांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 ला झाला आहे या निष्कर्षावर आले होते तर इतिहासकार एन.आर. फाटक यांनी 6 एप्रिल 1927 ला झाला असल्याचे समितीसमोर मांडले होते. तेव्हाही अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याचे लक्षात आले होते. जे आजही पाहायला मिळतात. अनेक इतिहास या विषयावर आजही बोलणे टाळतात.