तुम्हीसुद्धा वापरता स्मार्ट वॉच? परंतू, ठरू शकते 'या' आजाराला कारणीभूत

जगातील काही ब्रँड्सच्या स्मार्ट वॉचेस जीवघेण्या आजाराला आमंत्रण देण्याला कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या स्मार्ट वॉचेसमुळे कर्करोगासारखा घातक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. 

Updated: Jan 28, 2025, 12:38 PM IST
तुम्हीसुद्धा वापरता स्मार्ट वॉच? परंतू, ठरू शकते 'या' आजाराला कारणीभूत title=

Smart Watch: आपल्यापैकी अनेकांना स्मार्ट वॉचचा वापर करायला खूप आवडते. हाताच्या मनगटावरील स्मार्ट वॉच हे आकर्षक दिसण्याव्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत. बरेचजण हे स्मार्ट वॉच अगदी आवडीने घालतात. स्मार्ट वॉचचे फायदे तर सर्वांना माहितच आहेत, मात्र, काहीवेळेस मनगटावरील हे स्मार्ट वॉच जीवघेणे सुद्धा ठरु शकते. स्मार्ट वॉचचा नेमका कसा होतोय आरोग्यावर वाईट परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.

बरेच लोक आकर्षकतेसाठी ब्रँडेड स्मार्ट वॉचेस विकत घेतात आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करतात. परंतु, हाताच्या मनगटावरील स्मार्ट वॉच हे नक्की तुमच्या आरोग्याची काळजी घेतेय का? असा प्रश्न आता उद्भवू लागला आहे. कारण जगातील काही ब्रँड्सच्या स्मार्ट वॉचेस जीवघेण्या आजाराला आमंत्रण देण्याला कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या स्मार्ट वॉचेसमुळे कर्करोगासारखा घातक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. 

नुकतंच, अमेरिकेत 15 स्मार्ट वॉच ब्रँड्सचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात स्मार्ट वॉचच्या निर्मितीमध्ये काही घातक रयायनांचा वापर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. यात परफ्लुओरोक्लिल आणि पॉलिफ्लुओरोक्लिल सबस्टन्सेस या घातक रयायनांचा समावेश असल्याचे समोर आले. धोकादायक रसायने कॅन्सरसारख्या आजाराला कारणीभूत ठरतात.

कंपनीचे म्हणणे काय?

  • अ‍ॅपल या स्मार्ट वॉच कंपनीच्या मते, त्यांच्या उत्पादनात फ्लुरोइलास्टोमर या घटकाचा वापर केला जातो. फ्लुरोइलास्टोमर हे एक कृत्रिम रबर असून त्याचा शरीराला धोका निर्माण होत नाही. त्यात फ्लोरिन हा घटक असून 'पीएफएएस' ही घातक रसायने नसतात. 
  • या स्मार्ट वॉचमधील रसायने मानवी आरोग्याला धोकादायक ठरणार नाहीत याची खात्री करुनच ती उत्पादनात वापरली जातात. 

याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद

अ‍ॅपल कडून स्मार्ट वॉचच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रबरमध्ये 'पीएफएएस' ही रसायने असतात, जी लपवून वापरली जातात. यामुळे जीवघेण्या आजारांचा धोका उद्भवत असल्याचे या याचिकेत मांडले आहे. 

हे ही वाचा: GK : न घासताही प्राण्याचे दात स्वच्छ कसे राहतात? जाणून घ्या कारण

 

'या' आजारांचा धोका

स्मार्ट वॉचमध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे जन्मदोष, मुत्रपिंडाशी संबंधित आजार, प्रजनन समस्या तसेच मुत्राशयाच्या कर्करोगाच्या आजाराचा धोका वाढतो. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x