Height of the idol of God: घरातील देवाच्या मूर्तीची उंची किती असावी? पूजेपूर्वी 'हे' नियम जाणून घ्या

Size of God Idols in Temple: आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवलेल्या देवाची प्रत्येक मूर्ती किंवा वस्तू ही वास्तु नियमानुसार असायला हवी. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 6, 2024, 10:53 AM IST
Height of the idol of God: घरातील देवाच्या मूर्तीची उंची किती असावी? पूजेपूर्वी 'हे' नियम जाणून घ्या title=

Vastu Shastra: छोटं का असेना प्रत्येक हिंदू घरात तुम्हाला देव्हारा नक्कीच सापडेल. काहींच्या घरांमध्ये मोठे देव्हारे देखील असतात. देव्हाऱ्यात विविध प्रकारच्या देवांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रात घरच्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या देवाच्या मूर्ती किंवा फोटोच्या दिशेसोबत त्याची उंचीही योग्य असायला हवी. मंदिर अशा ठिकाणी असावे की, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे असेल. तसेच जाणून घ्या घरच्या मंदिरात देवाची मूर्ती किती मोठी असावी.

 

किती इंचाची असावी मूर्ती? 

घरातील देव्हाऱ्यात मोठ्या मूर्ती ठेवू नये. शास्त्रानुसार देवी-देवतांच्या मूर्तींची उंची ३ इंचांपेक्षा जास्त नसावी. मूर्ती तुमच्या अंगठ्याच्या उंचीची असावी. अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात शक्यतो ठेवू नये. मोठ्या आकाराच्या मूर्तींची पूजा करताना अनेक नियम पाळावे लागतात. त्यांच्या पूजेत छोटीशी चूकही अशुभ मानली जाते. 

 

शिवलिंग लहान असावे 

काहींच्या देव्हाऱ्यात शिवलिंगाची मूर्ती असते तर काही लोक त्याचे चित्र किंवा फोटो लावतात. पण हे लक्षात घ्या शिवलिंगाचा आकार मोठा असेल तर त्यात अनेक दोष आढळतात. अशा स्थितीत मंदिरात ठेवलेल्या शिवलिंगाचा आकारही अंगठ्याएवढा असावा. घरामध्ये यापेक्षा मोठे शिवलिंग असू नये.

तुटलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नकात 

घराच्या मंदिरात कधीही तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती ठेवू नका. त्या मूर्ती ताबडतोब मंदिरातून काढून टाका. अशा मूर्ती नदी, तलावाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवाव्यात. देवाचे तुटलेले चित्र किंवा मूर्ती मंदिरात ठेवणे अशुभ मानले जाते.

 

मंदिरात तांब्या-पितळेच्या मूर्ती ठेवाव्यात 

घरातील मंदिरात मातीच्या मूर्तींच्या जागी तांब्या-पितळेच्या मूर्ती ठेवल्यास त्या तुटण्याची भीती राहत नाही. याशिवाय या मूर्तीला अंघोळ घालणे आणि  स्वच्छ करणेही सोपे जाते. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य सामान्य प्रथा आणि विश्वासांवर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)