Turkey Earthquake LIVE : तुर्कीला भूकंपाचा तिसरा धक्का! मृतांची संख्या 1900 हून अधिक; आणखीन धक्के बसण्याची शक्यता

Turkey Earthquake LIVE :  तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इमारतीखाली दबल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास तुर्कीला दुसरा भूकंपाचा धक्का बसला.

Turkey Earthquake LIVE : तुर्कीला भूकंपाचा तिसरा धक्का! मृतांची संख्या 1900 हून अधिक; आणखीन धक्के बसण्याची शक्यता

Turkey Earthquake LIVE Updates: शक्तिशाली भुकंपाने तुर्की (Turkey Earthquake) हादरलं असून मोठा हाहाकार उडाला आहे. आलेला भूकंप 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असल्याने मृतांचा (Turkey Earthquake Death) आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळांवर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रसमध्ये (Cyprus) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आतापर्यंत या भूकंपानं 195 नागरिकांचा बळी घेतला आहे तर हजारो नागरिकांना बेघर केलं आहे. 

 

6 Feb 2023, 10:21 वाजता

जानेवारी 2020 मध्ये Elazig येथे 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, Aegean समुद्रात 7.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 114 लोक ठार आणि 1,000 हून अधिक जखमी झाले होते.

 

6 Feb 2023, 10:21 वाजता

भूकंपात मृत्यू झालेल्यांचा आकडा 53 वर पोहोचला आहे. घटनास्थळांवर बचावकार्य सुरु असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

6 Feb 2023, 10:20 वाजता

तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप क्षेत्रांपैकी एक आहे. 1999 मध्ये तुर्कीत सर्वात मोठा भूकंप आला होता. Duzce प्रांतात हा भूकंप आला होता. या भूकंपात तब्बल 17 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इस्तानबूलमधील 1000 लोकांचा समावेश होता. सुरक्षिततेची खबरदारी न घेता मोठ्या इमारतींना परवानगी दिलेल्या इस्तांबूलचा मोठ्या भूकंपामुळे विनाश होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

 

6 Feb 2023, 10:19 वाजता

गझियानटेपचा सीरियाला लागून असणारा दक्षिणेकडील प्रदेश आहे. हा तुर्कस्तानच्या प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. AFP च्या वृत्तानुसार,, लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रस (Cyprus)मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

 

6 Feb 2023, 10:17 वाजता

स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 17.9 किलोमीटर (11 मैल) खोलीवर हा भूकंप झाला. दरम्यान USGS ने 15 मिनिटांनंतर पहिल्या ठिकाणी पुन्हा 6.7-रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली.