close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपुरात कपड्याच्या दुकानातून 2 लाखांची रोख आणि कपडे चोरीला

दुकानात चोरी करत 2 लाखांची रोख पळवली.

Updated: Sep 3, 2019, 04:42 PM IST
नागपुरात कपड्याच्या दुकानातून 2 लाखांची रोख आणि कपडे चोरीला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरातील एका कपड्यांचं दुकान फोडत चोरट्यानं तब्बल 2 लाखांचा रोख आणि कपडे चोरले आहे. हा चोरटा इतक्यावरच थांबला नाही, चोरी केल्यानंतर त्यानं चक्क दुकानाच्याच टेरेसवर आंघोळ करून आपले फाटके परिधान केलेल कपडे काढून अगदी नवरदेवा करता ठेवण्यात आलेले कपडे परिधान करून तिथून पसार झाला आहे. चोरीचा ही घटनाक्रम सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.  

नागपुरातील आयाचीत मंदिर मार्गावर असलेल्या आकाश मॉलमध्ये लग्नसराईसह विविध फॅन्सी कपडे मिळतात. दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी 31 ऑगस्टला  दुकान बंद करून घरी गेले. दुस-या दिवशी दुकान उघडले तर त्यांनी धक्काच बसला. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांच्या दुकानात चोरी झाली होती. एक तारखेला रात्री दोनच्या सुमारास एक चोरटा त्यांच्या दुकानातील ड्क्टमधून आत शिरला.

अगदी लहानशा डक्टमधून चोरटा आत कसा घुसला याबाबत अजूनही सर्वजण आश्चर्यचकित आहे. चोरट्यानं दुकानात आत आल्यानंतर अगोदर या गल्ल्यावर हात साफ केला. हा चोरटा इतक्यावरच थांबला नाही. दुकनातील आकर्षक कपडे पाहून ते परिधान करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. मग काय या महाशयांनी थेट दुकानाच्या टेरेसवर जाऊन अगोदर आंघोळ केली.त्यानंतर नवरदेवासाठीचे कपडे परिधान केले. या चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही चित्रित झाला आहे.

या चोरट्यानं दुकानातील काही कपडेही बॅगमध्ये भरले आणि मग तिथून तो दुकानाबाहेर पडला. त्यानंतर काही अंतर पायी गेल्यानंतर तो ऑटोकरून नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहचला. नागपूर रेल्वे स्टेशनरील सीसीटीव्हीत तो चित्रत झाला आहे. चोरी करताना आंघोळकरून नवे कपडे परिधान करणा-या या चोराची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.