अकोला : शहरातील २२८ टॉवर पैकी २२० मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अकोला शहरात विविध मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी महापालिका क्षेत्रात प्रशासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता अनधिकृत टॉवर्सचं जाळं पसरवलं आहे. यामुळे प्रशासनाचा ६ कोटी ६० लाखांचा महसूल बुडाला आहे. दरवर्षी संबंधित मोबाईल टॉवरचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र मोबाईल कंपन्यांनी ते केले नसल्याचे ही प्रशासनाचे म्हणणे आहे.