अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज

अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज आलेत.  

Updated: Feb 13, 2019, 07:44 PM IST
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज title=

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी तब्बल २५२ अर्ज आलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगारी पुजारी पदासाठी सर्व जातीच्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा होती. राज्य सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने रितसर जाहिरात प्रसिद्ध करुन इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले होते. देवस्थान समितीकडे दाखल झालेले अर्ज हे कोल्हापूर, सांगली, सिधुदुर्ग आणि बेळगांव जिल्ह्यातल्या उमेदवारांनी केले होते. यामध्ये सर्व जातीच्या उमेदवारांचा समावेश आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यामध्ये विद्यमान पुजाऱ्यापैकी एकाही पुजाऱ्याने अर्ज केलेला नाही.

अंबाबाई मंदिरात पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांपासुन ते रात्री १० वाजून ४५ मिनीटांपर्यत विविध पूजा अर्चा सुरु असतात. या पूजाअर्चेची माहिती संबधीत उमेदवाराला किती आहे, यावर त्याची निवड केली जाणार आहे. एकूण देवस्थान समितीकडे आलेल्या २५२ उमेदवारांपैकी जवळपास १०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये ५० उमेदवार हे पुजारी म्हणून निवडले जाणार आहेत तर ५० उमेदवार हे देवीचे सेवेकरी म्हणून निवडले जाणार आहेत.