विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे. 18 कोटींची करचोरीचा तपास (gst tax credit scam news) करताना हे घबाडच राज्य जीसटीच्या हाती सापडलं आहे. देशभरात कर चोरी करणारी हे मोठं रँकेट असल्याचा जीएसटी अधिका-यांना संशय आहे. तेव्हा जाणून घेऊया की प्रकार नेमका काय आहे. जीएसटी (gst) घोटाळ्यात गेल्या काही वर्षातील मोठी कामगीरी संभाजीनगर विभागानं केली आहे. शहरातील एक भंगार व्यापा-याच्या 18 कोटींच्या टँक्सची (tax fraud) चौकशी सुरु होती. त्यातून संशय आल्यानं याची सखोल चौकशी विभागानं सुरु केली. संभाजीनगरच्या भंगार कंपनीच्या पत्यावर छापा टाकल्यावर ते गोडाऊन नाही तर एत इमारतीतील फ्लँट असल्याचं उघड झालं आणि संशय बळावला. (500 crore GST input tax credit Scam exposed Narpur Crime News Marathi)
संभाजीनगरच्या फ्लँटचं रेंट अग्रीमेंट भंगार कंपनीच्या नावानं पुरावा म्हणून होतं. फ्लँट मालकाला बोलावल्यावर त्याच संबंध नसल्याचं उघड झालं. त्यानंतर कंपनीच्या बँक खाते तपासण्यात आले. ती बँक (bank) खातीही मुंबईतील वरळीची होती. त्यावरून हे खातं कुणी उघडले त्या अधिका-यांना ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली त्यातून आरोपींची नाव पुढं आली आणि 30 तारखेला मुंबईच्या डोंगरी आणि मस्जिद बंदर भागात गुप्तपणे 20 अधिका-यांच्या टीमन छापा टाकीत या घोटाळ्याच्या 2 मास्टरमाईंडना अटक करण्यात आली.
फरहत इन्टरप्राईडेस या नावानं हा प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळं करत होते. त्यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी 30 आधार कार्ड, पँन कार्ड, 30 वर सीम कार्डस असं आढळून आलं. इतकच नाही तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली यात अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचंही दिसून आलं. अनेक कंपन्या व्यावसायिक टँक्स चोरी करण्यासाठी या बनावट बिलांचा आधार घेतात आणि त्यातून कर भरण्यात सुट मिळवतात. या मुळ बोगस (company) कंपन्या टँक्स भरत नाहीत कारण त्यांचा थांगपत्ताच नसतो. याचा फायदा या कंपन्या घेतात. या 500 कोटींच्या बिलातून शासनाला 100 कोटी कर मिळाला असता मात्र तो पुर्ण बुडालाय. याची व्याप्ती देशभरात आहे आणि ती 1 हजार कोटीपेक्षा जास्त जाऊ शकते असा संशय अधिका-यांना आहे.
गेल्या काही वर्षातील करचोरीची ही धडाकेबाज कारवाई संभाजीनगरच्या टीमन केली आहे. यासाठी एक स्पेशल युनिट आता कामाला लागलं आहे. अनेक जण यांच्या रडारवर आहे. पकडलेले 2 आरोपींनी गोर गरीबांचे आधारकार्ड पँनकार्ड जमा करून या बोगस कंपन्या स्थापण केल्या आहेत आणि त्यातून ही लूट सुरु आहे. त्यामुळं रँकेटचे धागे हातात आले आहे. मात्र आवाका मोठा असल्यानं ते पुढं आणणं राज्य जीएसटी (gst department) विभागासमोर एक मोठं आव्हान आहे.