पुण्यातील ओशो आश्रमात भक्तांचा गोंधळ, गेट तोडून आत केला प्रवेश; पोलिसांचा लाठीचार्ज

Pune Oshos Followers: पुण्यात ओशो आश्रमात भक्तांनी गोंधळ घातला आहे. कोरेगा परिसरात ओशोचे भक्त आश्रमाचा गेट तोडून आतमध्ये शिरल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर पोलिसांनी भक्तांवर लाठीचार्ज केला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.   

Updated: Mar 22, 2023, 01:15 PM IST
पुण्यातील ओशो आश्रमात भक्तांचा गोंधळ, गेट तोडून आत केला प्रवेश; पोलिसांचा लाठीचार्ज

Lathicharge on Osho Followers: पुण्यात ओशो आश्रमात भक्तांनी गोंधळ घातला आहे. कोरेगावर परिसरात आचार्य रजनीस उर्फ ओशो यांचे यांचे भक्त आश्रमाचे गेट तोडून आश्रमात शिरल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यावेळी भक्तांवर लाठीचार्ज केला असून, काहींना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मंगळवारी ओशोचा संबोधी दिवस साजरा करण्यात आला. सर्व भक्तांना संन्यास माळेसहित आत आश्रमात सोडण्यात आलं होतं.  मात्र आज भक्तांना आत सोडण्यात न आल्याने भक्तांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्यांनी भजन गाण्यास सुरुवात केली होती. दरम्यान त्यांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश केल्याने व्यवस्थापनसोबत वाद झाला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी भक्तांवर लाठीचार्ज केला. यानंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं.

आचार्य रजनीश (ओशो) यांच्या 70 व्या संबोधी दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्याने मंगळवारी काही अनुयायांनी आश्रमाच्या गेटबाहेर धरणं आंदोलन केलं. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (OIF) च्या विश्वस्त आणि व्यवस्थापन सदस्यांनी आश्रमाच्या जमिनीची तोडफोड करून ती अनधिकृतपणे विकण्याचा कट रचला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, त्यांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे असा आरोप केला. 

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश आणि जगभरातून 1000 हून अधिक अनुयायी पुणे आश्रमात पोहोचले होते. जमीन बेकायदेशीरपणे विकण्याचा, आश्रमातून ओशोंचं अस्तित्व मिटवण्याचा आणि त्यांची शिकवण नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अनुयायांनी केला.