भाजप कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Updated: Sep 5, 2018, 09:57 PM IST
भाजप कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की
सौजन्य - सोशल मीडिया

बुलडाणा : मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याचे पदसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. राम कदम माफी मागण्याऐवजी दिलगिरी व्यक्त करण्याची भाषा करत आहेत. आता बुलडाण्यात भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय. यावेळी नेहा प्रचंड संतापली असून तिला समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तिनेच हात जोडत आपला राग व्यक्त केला. 

भाजप कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

चिखली येथे भाजपच्या नेत्या, जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री नेहा पेंडसे हिला बोलावण्यात आले होते. नेहाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. परंतु नेहा स्टेजवर येत असताना तिला धक्काबुक्की करण्यात आली. ढिसाळ नियोजनामुळे नेहा प्रचंड संतापली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेली. यावेळी स्टेजवर नेहाने आयोजकांजवळ कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.