मुंबई : विदर्भ विभागाचा पत्रकारितेतीलसाठी कामगिरीबद्दल देण्यात येणारा देवर्षी नारद पुरस्कार झी २४ तासचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम यांना प्रदान करण्यात आला. सकारात्मक पत्रकारिता करत मयूर निकम यांनी आपल वेगळं स्थान निर्माण केलं त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला... बुलढाण्यातील जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवनावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच जिल्ह्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
याचबरोबर नागपूर विश्व संवाद केंद्र पूर्व विदर्भ विभागाचा पत्रकारितेतील कामगिरीकरता देण्यात येणारा यंदाचा देवर्षी नारद पुरस्कार झी 24 तासचे विदर्भ ब्युरो हेड अमर काणे याना प्रदान करण्यात आला. चिटणीस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख नरेन्द्र कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुद्रित माध्यमांच्या गटातून गोंदिया येथील पत्रकार अपूर्व ममेथी यांना तर दृक-श्राव्य माध्यमातून व्हिडीओ जर्नलिस्ट अतुल हिरडे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.