खासदार नवनीत राणांचा सायकल चालवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

 पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: Jan 19, 2020, 01:26 PM IST

अमरावती : अमरावतीचा खासदार नवनीत राणा या त्यांच्या स्टाईल, मतदार संघाचील कामे आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्या सायकल चालवताना दिसत असून त्यांनी या माध्यमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश अमरावतीकरांना दिला आहे. 

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सायकल चालवून आरोग्य, पर्यावरण आणि ईंधन संरक्षणाचा संदेश दिला. अमरावती शहरात पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रॅलीचा समारोप

या सायकल रॅलीत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडु व खासदार नवनीत राणा यांनी सायकली चालवत या सायकल रॅलीत पुढाकार घेतला. जिल्हा क्रीडा संकुलात सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी विजेत्यांना ११ सायकली बक्षिस देण्यात आल्या.