अमरावती, अचलपुरात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय 

Updated: Feb 27, 2021, 10:02 AM IST
अमरावती, अचलपुरात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर  title=

अमरावती :  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सात दिवसांच्या (7 Days Lockdown on Achalpur and Amravati)  कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अचलपुरात नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. अचलपूर बसस्थानकात मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असतेय पण अचलपूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्याने बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळात आहे. 

लातूरमध्ये जनता कर्फ्यू 

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं होतं. या जनता कर्फ्यु मध्ये प्रशासनातर्फे कसल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं होतं. या जनता कर्फ्यूचा आज पहिला दिवस आहे.. HOLD FOR WKT  लातूर शहर आणि जिल्ह्यात कशा पद्धतीने जनता कर्फ्यु सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी.

नागपुरात नागरिकांना दोन दिवस घरी राहण्याचं आवाहन 

नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज व उद्या  नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच आवाहन प्रशासनानं केलं आहे.  बाजारपेठांसह , हॉटेल रेस्टॉरंट, दुकान  नागपुरात    बंद राहणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा  नागपुरात हजारच्या पुढे गेलेला आहे.. त्यामुळं कोरोनाची चिंता वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज व उद्याचा  मिनी लॉकडाऊन महत्वाचा आहे.  अनेक निर्बंध लावण्यात आले असून प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने  बंद राहणार आहे. लोकांनी घरीच राहा, आवश्यक्तेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन पालकमंत्री आणि महापौरांनीही केलंय.दरम्यान नियम मोडणा-यांवर कारवाईही कडक करण्यात येणार आहे.