Ajit Pawar Vs Sambhajiraje : अजित पवार असं म्हणाले तरी काय? संभाजीराजे संतापले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला

सभागृहामध्ये अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती देखील(MP Sambhajiraje Chhatrapati) अजित पवारांवर चिडले आहेत. 

Updated: Jan 2, 2023, 09:33 PM IST
Ajit Pawar Vs Sambhajiraje :  अजित पवार असं म्हणाले तरी काय? संभाजीराजे संतापले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला title=

Ajit Pawar Vs Sambhajiraje : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये (Nagpur Winter Session) केलेल्या वक्तव्यावरुन संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला आहे. सभागृहामध्ये अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती देखील(MP Sambhajiraje Chhatrapati) अजित पवारांवर चिडले आहेत. 

अजित पवार असं म्हणाले तरी काय?

आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काहीजण त्यांना धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer) अधिवेशनात ठणकावून सांगितलं. त्यानंतर आता अजितदादांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर निदर्षने देखील केली जात आहेत. 

संभाजीराजेंनी अजित पवारांना ठणकावले

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, आहेत आणि राहतील. अशा शब्दांत संभाजीराजेंनी अजित पवारांना ठणकावून सांगितल आहे. अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही निषेध त्यांनी केलाय. अजित पवारांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अजित पवारांचं विधान हे अर्धसत्य आहे.. तेव्हा त्यांनी ते विधान मागे घ्यावं अशी मागणीही संभाजीराजेंनी केली. अजित पवारांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला तेही सांगावं असं आवाहनही त्यांनी केले.

अजित पवारांच्या विधानाचं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याकडून समर्थन

छत्रपती संभाजीराजेंबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विधानाचं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले आहे. संभाजीराजेंना छत्रपती ही पदवी असताना धर्मवीर हे शेपूट कशासाठी अशा तिखट शब्दांत त्यांनी सवाल उपस्थित केलाय. संभाजीराजेंची बदनामी करणा-यांनाच धर्मवीर पदवी हवी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पुणे-नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात भाजपचं आंदोलन

पुणे-नाशिकमध्येही अजित पवारांविरोधात भाजपनं आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार निदर्शनं केली. पुण्यात खंडोजी बाबा चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक अजित पवारांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं.  तर नाशिकमध्येही भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला होता.

बारामतीत अजित पवारांच्या घरासमोरच राडा

बारामतीत अजित पवारांच्या घरासमोरच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. अजित पवारांचा पुतळा जाळून भाजप युवा मोर्चानं निषेध नोंदवलाय. बारामतीतल्या सहयोग या पवार निवासस्थावासमोर  भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.. 

अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट 

साता-यातही भाजप युवा मोर्चानं अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला. अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.