अशोक चव्हाण यांचा एकनाथ खडसे यांना सूचक इशारा

एकनाथ खडसे यांची ही स्थिती पाहून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील डाव टाकला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 25, 2018, 08:42 PM IST

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत स्टेज शेअर केलं.

अशोक चव्हाणांचा सूचक इशारा

या दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. एकनाथ खडसे यांची ही स्थिती पाहून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील डाव टाकला आहे.

एकनाथ खडसे यांच्या कार्याबद्दल स्तुतीसूमनं

एकनाथ खडसे यांची ही स्थिती पाहून अशोक चव्हाण यांनी जाहीर भाषणात, एकनाथ खडसे यांच्या कार्याबद्दल स्तुतीसूमनं उधळली. नाथाभाऊंनी आता ढकलण्याची वाट पाहू नये, असा सूचक इशारा दिला आहे. 

आणखी काय म्हणाले अशोक चव्हाण

आपले फोटो आले असतील उद्या वर्तमान पत्रात चौकटीत, जे छापतील ते छापतील आणि आपण हसलो बोललो, ते काही पक्षावर बोललो नाही, तेव्हा तसा काही विषय नाही, पण तुम्ही निर्णय घ्या, असं अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना सांगितलं.

पक्ष सोडायला भाग पाडू नका-खडसे

दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकंदरीत एकनाथ खडसे यांच्या मनातील खदखद दिवसेंदिवस वाढत आहे, कारण पक्ष सोडायला भाग पाडू नका, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.