'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'

सावंतवाडीमध्ये दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे

Updated: Oct 19, 2019, 05:58 PM IST
'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?' title=

सावंतवाडी, सिंधुदुर्ग : भाजपावासी झालेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजावूनही अखेर राणेंचा संयम सुटला प्रचारसभेत काही राणेंनी सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका केली. 'जर मी योग्य नव्हतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं?' असा खडा सवाल करत नारायण राणेंनी भाजपात असूनही महायुतीतल्या पक्षप्रमुखांवर शरसंधान साधलं. सावंतवाडीतल्या राजन तेली यांच्या प्रचारसभेत राणे बोलत होते, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि केसरकर यांचा समाचार घेतला. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री तसंच सिंधुदुर्गचे पालमंत्री दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे. विशिष म्हणजे, युतीचे  शिवसेनेच्या दीपक केसरकर यांच्याविरोधात जाऊन भाजपाकडूनही बंडखोर उमेदवार राजन तेलींना मदत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंसह विरोधकांना धोबीपछाड दिली होती. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा विजयी झालेला उमेदवार तीसऱ्यांदा विजयी होऊ शकलेला नाही, असा सावंतवाडीचा इतिहास आहे. दीपक केसरकर यांना या मतदारसंघानं दोन वेळा संधी देऊन झालीय... आता तिसरी संधीही केसरकरांना मिळणार का? या प्रश्नाचं लवकरच उत्तरदेखील मिळणार आहे.