काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांना घेरलं, उपस्थित केला 'हा' सवाल

Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर काँग्रेसने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना घेरलं आहे.  

Updated: Jul 1, 2022, 03:28 PM IST
काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांना घेरलं, उपस्थित केला 'हा' सवाल title=

मुंबई : Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर काँग्रेसने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना घेरलं आहे. कोश्यारी यांच्या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. जर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असेल तर आता कशी निवडणूक लावली आणि कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार, असा सवाल काँग्रेसने राज्यपाल यांना विचारला आहे. याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सवाल केला आहे.

काँग्रेसने सवाल करताना म्हटलेय, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपाल यांना केली होती. पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, असे सांगून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपाल यांनी घेतली नव्हती. मग आता कशी निवडणूक लावली आणि कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार आहे? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय.

काँग्रेसचे शिष्टमंडळ तीन-तीनवेळा राज्यपाल कोश्यारी यांनी भेटलो. तीन तीन वेळ आग्रह केला. आम्हाला विधानसभेचा अध्यक्ष निवडू द्यावा. घटनने तसं सांगितले आहे. मात्र, राज्यपालांकडून उत्तर आले, ही केस सर्वोच्चन न्यायालयात आहे. तसं विचार केला गेला तर उच्च न्यायालयाने ही केसच फेटाळून लावली होती. तुम्ही तेव्हा आम्हाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात केस आहे. आता तुम्ही ही निवडणूक लावू शकत नाही.

ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना असू शकत नाही. त्यामुळे उद्धवजी बोलले असावे, असे थोरात म्हणाले. पर्यावरण वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, ते नियम बदलले जात आहेत. ते बदलू नये म्हणून त्यांचे तसं मत आहे. पर्यावरण वाचण्यासाठी आहे. आता तिथे राजकारण आहे, असे मला वाटत आहे. मुंबई नुकसान नको असेल तर मेट्रो आरे कारशेड विषयी विचार केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.