जुईनगर : नवी मुंबईतल्या बँक ऑफ बडोदा शाखेवरच्या दरोडा प्रकरणात ज्या खातेदारांचे लॉकर लुटले गेले आहेत.
या दरोड्यानंतर बँकेनं हात वर केले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी असं बँकेकडून खातेदारांना सांगण्यात आलंय. यामुळे खातेदारांत तीव्र संताप आहे. आपला किंमती ऐवज सुरक्षित रहावा यासाठी बँकेतल्या लॉकरचा पर्याय स्विकारला जातो. मात्र बँकेच्या लॉकरवरच दरोडा टाकून कोट्यवधींचा ऐवज दरोडेखोरांनी लुटल्याची घटना, नवी मुंबईतल्या जुईनगरमध्ये घडली आहे. त्यामुळे आपल्या किंमती वस्तुंच्या सुरक्षेच्या हमीचं काय असा प्रश्न, आता बँक ग्राहक विचारत आहेत.
नवी मुंबईत बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आली आहेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून 29 लॉकर फोडून, अडिच कोटींहून जास्त ऐवज लुटल्याचं उघड झालंय. बँकेच्या जुईनगर शाखेपासून पाच दुकानं सोडून असलेला एक गाळा भाड्यानं घेऊन, त्यातून बँकेपर्यंत भुयार खणण्यात आलं होतं. भुयार चढा-उतरायला पाय-याही बांधण्यात आल्या होत्या. गेले काही महिने गुप्तपणे हे काम सुरू असताना आसपासच्या लोकांना संशय कसा आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय