सावधान! मसाला ठरू शकतो जीवघेणा; भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या

मसाले खरेदी करताना आता अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण, २ नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा प्रकार भिवंडीत उघड झालाय. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्यात. 

Updated: May 25, 2024, 11:00 PM IST
 सावधान! मसाला ठरू शकतो जीवघेणा; भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या  title=

Bhiwani Crime News :  चमचमीत, तिखट आणि मसालेदार जेवण अनेकांना आवडतं. तुम्ही देखील चविष्ट जेवण बनवण्यासाठी बाजारातून विविध प्रकारचे मसाले खरेदी करत असाल. तर आता तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण, बाजारात बनावट मसाला विक्रीला आल्याचं उघड झालंय. दोन नामवंत कंपन्यांच्या नावानं बनावट मसाला विकणाऱ्या दोघांना भिवंडीत पकडण्यात आलंय. 

पोलिसांनी सापळा रचून महेश यादव आणि मोहम्मद अफजल प्रधान या मसाला तस्करांना बेड्या ठोकल्यात. बनावट मसाल्याचा माल भिवंडीच्या जब्बार कंपाऊंड इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे १ लाख रुपये किंमतीचा हा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी सुरतमधून मसाल्याची खरेदी केल्याचं उघड झालंय. आरोपींकडून पोलिसांनी टेम्पोही ताब्यात घेतलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

भिवंडीत 2 नामवंत कंपन्यांच्या नावानं बनावट मसाला विकणाऱ्या दोघांना पकडण्यात आलंय. पोलिसांनी सापळा रचून महेश यादव आणि मोहम्मद अफजल प्रधान या मसाला तस्करांना बेड्या ठोकल्यात. बनावट मसाल्याचा माल भिवंडीच्या जब्बार कंपाऊंड इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा हा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी सुरतमधून मसाल्याची खरेदी केल्याचं उघड झालंय. आरोपींकडून पोलिसांनी टेम्पोही ताब्यात घेतला आहे. 

रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं काहीतरी चमचमीत बनवण्याचा तुमचा बेत नक्कीच असेल.. मात्र तुम्ही वापरत असलेला मसाला बनावट तर नाही ना, याची जरूर खात्री करून घ्या.