'शेतकऱ्यांची वीज कापता, आणि उर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी'

उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत.

Updated: Mar 18, 2021, 06:33 PM IST
'शेतकऱ्यांची वीज कापता, आणि उर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी' title=

मुंबई : उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी म्हटलंय, की ‘सरकार पैसे नाही म्हणतं, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापतं, कोरोना योद्ध्यांना पगार देत नाही. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी कार्यालय आणि बंगल्यावर जाऊन पाहा, कसे पैसे उधळतायत’

याबाबत अद्याप उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर बंगल्यावरूनही राजकारण रंगताना दिसतं. याआधी सुद्धा महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यावर पैसे उधळल्याचा आरोप भाजपने केला होता.