प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत नक्षलींकडून जाळपोळ

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला नक्षल्यांनी (Naxals) डोकं वर काढले आहे. 

Updated: Jan 26, 2021, 11:41 AM IST
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत नक्षलींकडून जाळपोळ    title=

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला नक्षल्यांनी (Naxals) डोकं वर काढले आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील अल्लेंगा - अल्लूर मार्गावर जाळपोळ करण्यात आली. कसनसुर- अल्लेंगा मार्गाचे काम सध्या सुरु आहे. (Naxals in Gadchiroli ) 

नक्षल्यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडले आणि काम करत असलेल्या मजुरांना परत पाठवले. रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबी, रोडरोलरची जाळपोळ केली. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलीही विरोधाची घटना न घडवणारे नक्षली अचानक परत एकदा सक्रिय झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडचिरोलीत नक्षल्यानी पुन्हा डोके वर काढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एटापल्ली तालुक्यातील अल्लेंगा - अल्लूर मार्गावरील काम रोखले. शिवाय येथील यंत्र सामुग्री जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.