कोळसा चोरीच्या आरोपात तरूणांना अमानुष मारहाण

 सुरक्षा रक्षकांनी २ युवकांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे.

Updated: Aug 27, 2018, 02:02 PM IST

चंद्रपूर : चंद्रपुरात तरुणांना बेदम मारहाणीचा व्हिडिओ वायरल झालाय.  वेकोली दुर्गापूर क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कोळसा चोरीच्या आरोप करत सुरक्षा रक्षकांनी २ युवकांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओ व्हायरल 

अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ  समाजमाध्यमांवर वायरल झाल्याने नागरीकातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. हे युवक नेमके कोण आहेत ? आणि त्यांनी या मारहाणीची तक्रार पोलिसात केलीय का याचा शोध घेतला जात आहे.