सर्वसामान्यांना आणखी एक 'शॉक'; 'इतक्या' रुपयांनी वाढणार वीज Bill

दिलासा नाहीच! सर्वसामान्यांना वीज दर वाढीनं फुटणार घाम, 'इतक्या' रुपयांनी वाढणार Bill  

Updated: Sep 5, 2022, 08:56 AM IST
सर्वसामान्यांना आणखी एक 'शॉक';  'इतक्या' रुपयांनी वाढणार वीज Bill title=

मुंबई : सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं (electricity price) शॉक दिला आहे. सर्वसामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा 'शॉक' बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील महावितरण ग्राहकांचं वीज बिल येत्या काळात 60 ते 70 पैसे प्रति युनिट म्हणजेच 150 ते 200 रुपयांनी अधिक येण्याची शक्यता आहे.  वीज उत्पादन खर्च वाढलाय. त्याचा भार इंधन समायोजन शुल्काद्वारे (electricity shock) अखेर ग्राहकांवरच येणार आहे. (Increase in electricity rates in Maharashtra)

 

राज्य सरकारी महनिर्मिती कंपनीला केवळ राज्य सरकारच्याच महावितरण कंपनीलाच वीज विक्रीची परवानगी आहे. कोळसा टंचाईमुळे (Coal shortage) वीज निर्मितीचा खर्च वाढलाय. नोव्हेंबरनंतर ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. 

दिवसागणिक महागाईचा भडका वाढताना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे देखील सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इंधन, गॅस सिलेंडर, दूधाच्या दरात वाढ झाल्यानंतर,  आता वीज दरवाढीचा 'शॉक' बसण्याची (electricity price hike) शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे महिलांचं महिन्याचं गणित कोलमडणार आहे.