खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; मंदाकिनी खडसेंविरोधात 'या' प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

 जळगाव जिल्हा दूध संघात आज भाजपनेते गिरीश महाजन समर्थक प्रशासक मंडळ आणि राष्ट्रवादीचे नेते  एकनाथ खडसे समर्थक संचालक मंडळ आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. 

Updated: Aug 3, 2022, 11:55 AM IST
खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; मंदाकिनी खडसेंविरोधात 'या' प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल title=

वाल्मिक जोशी, जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात आज भाजपनेते गिरीश महाजन समर्थक प्रशासक मंडळ आणि राष्ट्रवादीचे नेते  एकनाथ खडसे समर्थक संचालक मंडळ आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान दिवसभराचा दोघांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. 

मंदाकिनी एकनाथराव  खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात प्रशासक मंडळाने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. मंदाकिनी खडसे या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत.

प्रशासकीय मंडळातील सदस्य आणि गिरीश महाजन यांचेय समर्थक अरविंद देशमुख यांनी ही तक्रार दिली आहे. संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाकिनी खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृत दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे, अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.