राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

ग्रामीण भागात आजही आहे वृद्धांबद्दल मानसन्मान...अचानक एक वृद्ध आजोबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री वळसे यांना दिसतात, व्हिडीओ पाहा  

Updated: Feb 22, 2022, 02:01 PM IST
राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते.... title=

हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे :  जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावात एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले. यावेळी गृहमंत्र्यांनी या वृद्ध आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून नमस्कार केला. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले होते. त्यांनी या वृद्ध आजोबांना आपले वय किती असं विचारल्यावर आजोबांनी हि हसत फक्त 105 वर्ष सांगितलं.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी थेट या आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून या आजोबांना नमस्कार केला. कोंडाजी भोर असं या आजोबांच नाव आहे. या प्रसंगी आमदार अतुल बेनके आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व पांडुरंग पवारही उपस्थित होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आजोबांसमोर नतमस्तक होताना पाया पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नवनीत राणा, उदयनराजे भोसले किंवा गिरीश महाजन आणि आता चर्चेत आलेले संदीप क्षीरसागर हे जनतेसोबत कार्यक्रमात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चर्चेत आले आहेत.

नवनीत राणा, उदयनराजे भोसले किंवा गिरीश महाजन आणि आता चर्चेत आलेले संदीप क्षीरसागर हे जनतेसोबत कार्यक्रमात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चर्चेत आले आहेत.