कोरोनाचा फटका : अंड्याच्या दरात वाढ

सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका 

Updated: Oct 20, 2020, 07:25 PM IST
कोरोनाचा फटका : अंड्याच्या दरात वाढ  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनामुक्तपीडितांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे क्षमता वाढण्यासाठी आणि अशक्तपणा घालवण्यासाठी च्या मांसाहारी पदार्थांचा अंडी जोरदार महागली आहेत. कोरोना सुरू झाला त्यावेळेस सर्वाधिक फटका बसला तो पोल्ट्री उद्योगाला चिकन अंडी पिल्ले अक्षरशः पुढची उद्योगांना फेकून द्यावी लागली इतकंच नाही तर फुकट वाटतात चिकन मुळे कोरोना होत नाही असा प्रसार करावा लागला मात्र आज नेमकी परिस्थिती उलटी आहे सध्या सर्वात अधिक दर झालेत ते अंड्याचे... तीन चार महिन्यापूर्वी फेकून द्यावे लागणारे अंडे आता चक्क सहा रुपयाच्या सरासरी दराने किरकोळ नागरिकांना मिळत आहे. 

सध्या बाजारात साधे अंडे 5.30 ते 7 रु दराने तर गावठी अंडे 11 ते 12 रु दराने बाजारात उपलब्ध आहेत. कोरोना झालेला व्यक्ती आठ ते दहा दिवसात उपचाराने बरा होतो मात्र त्यानंतर त्याला जाणवणारा अशक्तपणा हा दीड ते दोन महिने राहतो प्रत्येकाला हा अशक्तपणा घालवण्यासाठी सकाळ-दुपार-संध्याकाळ अंडी पाया सूप चिकन मटण खेकडे अशा मांसाहारी पदार्थांचे सेवन करावे लागतेय. अगदी कट्टर शाकाहारी असलेल्या लोकसुद्धा यामुळे माणसाकडे पडलेत परिणामी कोरोना उपचारांचा खर्च आणि त्यात आता दुरुस्त होण्यासाठी चा महागडा खर्च लोकांना करावा लागतो आहे.

वडापाव प्रमाणे ग्रामीण भागामध्ये ब्रेड ब्रेड ऑम्लेट एक सर्वसामान्य गरिबांचं जेवण असते. आता या वाढलेल्या महागाईमध्ये हे स्वस्तातलं जेवणही महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झालं बसू लागली आहे.