अभ्यासासाठी मुलाला रागावू नको असं पत्नीला सांगितलं, पत्नीने थेट जग सोडलं...

क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीमध्ये भांडण झालं आणि तिने थेट टोकाचं पाऊल उचललं

Updated: Feb 14, 2022, 06:53 PM IST
अभ्यासासाठी मुलाला रागावू नको असं पत्नीला सांगितलं, पत्नीने थेट जग सोडलं... title=

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलाला रागावू नकोस असं पतीने सांगितल्याने रागवलेल्या पत्नीने थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं राकेश थोरात आपल्या कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे राकेश थोरात कामावरुन घरी परतले. यावेळी घरात पत्नी रोहिणी मुलाचा अभ्यास घेत होती. मुलगा अभ्यास करत नसल्याने रोहिणीने मुलाला मारहाण केली. यावेळी राकेश थोरात यांनी मध्ये हस्तक्षेप करत मुलाला मारू नकोस असं रागात सांगितलं.

पतीने ओरडल्याचा राग येत रोहिणीने बेडरुममध्ये जात दरवाजा बंद करुन घेतला. यानंतर बराचवेळ बाहेर न आल्याने पती राकेशने बेडरुमचा दरवाचा ठोठावला आणि तिला आवाज दिला. पण आतून कोणतंच उत्तर आलं नाही. त्यामुळे चावीने दरवाजा उघडून राकेश यांनी बेडरुममध्ये प्रवेश केला.

तेव्हा समोरचं चित्र पाहून त्यांच्या पायखालची जमीनच सरकली. पत्नी रोहणीने घराच्या छताला गळफास घेत आयुष्य संपवलं होतं. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत.