Dahi Handi 2022 : अमृता फडणवीसांच्या गाण्यानं गोविंदा मंत्रमुग्ध

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या गोड गळ्याने गाणं गात गोविंदाना मंत्रमुग्ध केलं. अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.

Updated: Aug 19, 2022, 11:14 PM IST
Dahi Handi 2022 : अमृता फडणवीसांच्या गाण्यानं गोविंदा मंत्रमुग्ध title=

पुणे : राज्यात दिवसभर दहीहंडीचा (Dahi handi 2022) उत्साह पाहायला मिळाला. मुंबईसह ठाण्यात थरांचा थरार पहायला मिळाला. जय जवान गोविंदा पथकाने 9 थर लावत आपली बादशाहत कायम ठेवली. या दहीहंडी उत्साहात सेलिब्रेटींनी उपस्थिती लावून चार चाँद लावले. मात्र चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर (Amruta Fadnavis) अमृता फडणवीस यांचीच. (dcm wife and banker amruta fadnavis sing a song in dahi handi festival at bavdhan pune)

अमृता फडणवीस यांनी आपल्या गोड गळ्याने गाणं गात गोविंदाना मंत्रमुग्ध केलं. अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.  पुण्यामध्ये बावधन गावात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी गाण्याची झलक उपस्थितांना ऐकवली. 

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत गायलेली गाणी

श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेल्या 'मानिके मागे हिते' या गाण्यावर आधारित ‘मन ही मन तुझे चाहा…’ 

‘अलग मेरा ये रंग है’

'गणेश वंदना' 

"तिला जगू द्या..."

‘तू मंदिर, तू शिवाला’