विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! CET प्रवेशाबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा

विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी! CET आणि 12 वीबाबात मोठी घोषणा

Updated: May 31, 2022, 04:29 PM IST
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! CET प्रवेशाबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा title=

पुणे : विद्यार्थी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी आहे. CET परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सीईटीचे 50 टक्के आणि 12 वीचे 50 टक्के गुण गृहित धरणार असल्याचं सांगितलं आहे. 

पुढच्या वर्षीपासून सर्व प्रकारच्या CET प्रवेशांना हा नवा निर्णय लागू असेल. पुढच्या वर्षीपासून 1 जुलैला CET चा निकाल लागेल आणि 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल असंही यावेळी उदय सामंत यांनी बोलताना सांगितलं. 

पुढच्या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया राबवताना सीइटीचे 50 टक्के आणि 12 वीचे 50 टक्के गुण गृहित धरले जाणार आहेत. सीईटीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा निर्णय लागू होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती दिली आहे. पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे

MHT CET परीक्षा म्हणजे काय?
BE, BTech, BPharm किंवा DPharm अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET आयोजित केली जाते. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटांमध्ये घेतली जाते. 

सीईटीचा पेपर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तर 80 टक्के अभ्यासक्रम हा इयत्ता 12 वीवर आधारित आणि उर्वरित टक्केवारी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 11वीवर आधारित असेल.