close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धक्कादायक, यात्रेला जाताना विजेचा धक्का लागून आजीसह नातीचा मृत्यू

 यात्रेत आजीसह नातीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

Updated: Apr 19, 2019, 08:27 PM IST
धक्कादायक, यात्रेला जाताना विजेचा धक्का लागून आजीसह नातीचा मृत्यू

जालना : येथील मंगला देवीच्या यात्रेत आजीसह नातीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. डीजेच्या गाडीतून देवीच्या दर्शनासाठी जाताना ही दुर्घटना घडली आहे. डीजेची गाडी मुख्य लाईनच्या तारेखालून जाताना गाडीत करंट उतरल्याने ही घटना घडली.

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील देऊळगाव उगले येथे  ही दुर्घटना घडली. अनुसया साबळे (65) या  वर्षीय महिलेसह 18 वर्षीय अश्विनी साबळेचा या घटनेत मृत्यू झाला.