jalgaon bafna jeweller raid : जळगाव सुवर्ण नगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर आलं आहे. आर सी बाफना ज्वेलर्सवर आयकर विभागानं धाड टाकली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान, बाफना ज्वेलर्सकडे 8 ते 9 किलो सोने आढळलं. जळगाव शहरातील आर सी बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुममध्ये, काल रात्री आयकर विभागाच्या पथकानं चौकशी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना 8 ते 9 किलो सोने चौकशीत आढळून आले असून हे सोने आर सी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरुममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली.
काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. पत्र्या मारुती चौकातील ज्वेलर्सची झाडाझडती करण्यात आली. हडपसर, मगरपट्टा, बाणेर भागातही आयकरने धाडी टाकल्या. आयकर विभागाकडून पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू झाली. आयकर विभागाचे अधिकारी 40 वाहनांमधून छापासत्रासाठी दाखल झाले होते.
सोन्याच्या भावात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं जवळपास सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जातंय. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावमध्ये सोन्याचा भाव तब्बल ७६ हजार तिनशे रुपये प्रति तोळा इतका GSTसह नोंदवला गेला. तर चांदी ८६ हजार पाचशे रुपये प्रति किलो GSTसह आहे. एकीकडे बँकांचे स्थीर व्याजदर आहेत, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांचाही सोने खरेदीकडे कल वाढलाय. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. तर ऐन लग्नसराईमध्ये सोनं महाग झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे.