Pune News : पुण्याचे शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं 26 आक्टोबरला निधन झालं होतं. विनायक निम्हण यांना जाऊन 20 दिवसही झाले नाहीत तर त्यांच्या आईंनाही देवाज्ञा झाली आहे. सावित्री महादेव निम्हण असं विनायक निम्हण यांच्या आईंचं नाव आहे. (Former MLA Vinayak Nimhans mother Savitri Mahadev Nimhan passed away Pune Marathi news)
विनायक निम्हण यांच्या जाण्याने दिवाळीमध्ये त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अजून महिनाही झाला नाहीतर त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे निम्हण कुटुंबावर दुसरा आघात झाला आहे. 26 आक्टोबरला विनायक (आबा) निम्हण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.
सलग तीनवेळा शिवाजीनगर मतदारसंघातून 1999 ते 2014 अशी 15 वर्षे निवडून आले होते. दोनवेळा शिवसेनेतून तर एक टर्म काँग्रेसमधून त्यांनी विजय मिळवला होता. भाजप नेते नारायण राणे यांनी शिवेसेनेमधून बाहेर पडत बंड केलं होतं. त्यावेळी विनायक निम्हण यांनीही शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र परत 2014 साली पुन्हा एकदा निम्हण यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये घरवापसी केली होती.