धक्कादायक ! सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या

फोटो काढण्याचा नाद कधीकधी जीव घेणा ठरु शकतो. अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.

Updated: Oct 15, 2022, 10:29 PM IST
धक्कादायक ! सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या title=

विरार : सेल्फी (Selfie) घेण्याचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. विरार जवळच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आलं असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विकएंडचं फोटोशूट बेतलं जीवावर

सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी फोटो किंवा सेल्फी काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही. काहीवेळी सेल्फीचा नाद जीवावर बेततो.