गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

दीपक भातुसे | Updated: Apr 11, 2019, 10:13 PM IST
गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना title=

गडचिरोली : गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. सकाळी एटापल्ली तालुक्यातील वांगेझरी मतदान केंद्राजवळ आयडीचा स्फोट घडवला.तर दुपारी धानोरा तालुक्यातील तुंबडीकसा येथे मतदान पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला केला. पुन्हा चार वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येते मतदान पथकातील सी सिक्सटी कमांडो पथकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झालेत. तर पाच वाजता गट्टा-जांबिया मार्गावरील चितोडा येते रस्त्यालगत चार आयडी बॉम्ब सापडले, ते निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर सायंकाळी पुन्हा गट्टा येथील सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मतदान पथकाला परत घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरवरही नक्षलवाद्यांचा गोळीबार, मात्र सुदैवाने कोणतीही अनुचित घटना नाही. दरम्यान, छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात मतदान पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला घडवून आणला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.

- गडचिरोलीतील दुर्गम आणि अतिसंवेदनशील कसनसूर भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरूंगाचा स्फोट
- कसनसूर पोलीस ठाण्यात हद्दीतील वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडवला भूसुरूंगाचा स्फोट
- स्फोटात सुदैवाने कुणीही जखमी नाही अथवा कोणतीही हानी नाही
- वाघेझरी केंद्रावर मतदान सुरु असताना अचानक झालेल्या स्फोटमुळे तेथे उपस्थित मतदार, आणि तैनात असलेल्या पोलीस जवानात खळबळ 
- काल गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणला होता स्फोट, त्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता
- दोन दिवसात लागोपाठ दुसरा स्फोट

- गडचिरोलीतील मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांकडून कमांडो पथकावर हल्ला
- हल्ल्यात सी सिक्सटी कमांडो पथकाचे तीन जवान जखमी 
- बेस कॅम्पवर परतणाऱ्या नक्षलविरोधी सी सिक्सटी कमांडो पथकाला नक्षलवाद्यांनी केलं टार्गेट
- आईडीचा स्फोट करून नक्षलवाद्यांचा कमांडो पथकावर गोळीबार
- एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदि परिसरातील घटना
- दिवसभरातील दुसरी घटना, तर कालपासूनची तिसरी घटना
- जखमी कमांडोंना नागपूरला हलवण्याची माहिती

- गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील तुमडीकसा मतदान केंद्रावरील मतदान पथकावर नक्षलवाद्यांचा गोळीबार
- मतदान पथकाच्या दिशेने तीन ते चार राऊंड फायर
- मतदान पथक बेस कॅम्पवर परतत असताना घडली घटना
- पोलीसांनी केलेल्या प्रति गोळीबारानंतर नक्षलवादी जंगलात फरार 
- गडचिरोलीतील दिवसभरातील तिसरी घटना

- एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये चकमक
- कोणतीही जीवितहानी नाही
- तर एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया मार्गावरील चितोडा येथे रस्त्याच्या कडेला चार आयडी बॉम्ब सापडले
- बॉम्ब निष्काम करण्यात पोलिसांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला
- गडचिरोलीतील दिवसभरातील पाचवी घटना