'तो' अर्धवट मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये, तपासासाठी चार पोलीस पथकं

 बॅग ठेवून जाणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

Updated: Dec 8, 2019, 04:31 PM IST
'तो' अर्धवट मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये, तपासासाठी चार पोलीस पथकं

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. अधर्वट शरीराचा मृतदेह स्थानकाजवळ ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न एका इसमाने केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याण रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार समोर आला. हा संशयित इसम कोण आहे ? ती मुलगी कोण आहे ? या दोघांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या घटनेची पार्श्वभुमी काय ? या साऱ्याचा तपास केला जात आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रिक्षाचालकाने एका इसमाला हटकले. त्या इसमाच्या हातामध्ये एक बॅग होती. या बॅगेतून दुर्गंधी येत होती. रिक्षा चालकाने हटकल्यानंतर त्या इसमाने तिथून पळ काढला. यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याचे समोर आले. या मृतदेहाचे धड गायब आहे. दरम्यान, बॅग ठेवून जाणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या याप्रकरणी, महात्मा फुले पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. 

पोलिस या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी यासाठी चार टीम रवाना केल्या आहेत. प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. घाईघाईने हा इसम धावत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मृतदेह आढळलेल्या मुलीची ओळख पटणं हे पोलिसांसमोरचे सध्या महत्वाचे आहे. 

रिक्षा चालकाच्या हुशारीमुळे ही घटना समोर आली आहे. ही मुलगी २० ते २५ वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल आल्यानंतर मोठ्या घटनेचा खुलासा होण्याची शक्यता आहे.