गुंडाची हत्या करून मृतदेह फेकला नदीत, तिघांना अटक

यशोधरानगर पाठोपाठ दाभा येथे हत्यची घटना. टॉमीने वार करून सहका-यानेच केली हत्या.

Updated: Aug 9, 2021, 09:33 AM IST
 गुंडाची हत्या करून मृतदेह फेकला नदीत, तिघांना अटक title=

नागपूर: नागपुरात कुख्यात गुन्हगाराची हत्या करून त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. शनिवारी रात्री हत्येची ही थरारक घटना उघडकीस आली.इब्राहिम खान उर्फ नबीखान असं मृतक गुडांचे नाव आहे.याप्रकरणी  रशीद शहा, अरबाज कुरेशी आणि शमी अन्सारी या तीन मारेक-यांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे.सोनू उर्फ इमरान अहमद अली हा मुख्य आरोपी फरार आहे.इब्राहिम खान उर्फ नबीखानवर तडीपारची कारवाई करण्यात आली होती. 

   याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड इब्राहिम सोनूला सातत्यानं पैशासाठी त्रास द्यायचा.यावरून दोघांनामध्ये अनेकदा वादही होत होते. याबाबत अरबाज,रशीदने इब्राहिमला सजवण्याचा प्रयत्न केला. मात्र इब्राहिमनं रशीदला शिवागाळ केली. नबी आपल्याला ठार मारेल हा धास्ती सोनूला होती.त्यामुळे त्यानं रशिद व अन्सारीला हाताशी घेवून नबीचा काटा काढण्यासाठी कट रचला.4 ऑगस्टला रशीदनं रात्री नबीला यशोधरागर परिसरात निजामुद्दीन कॉलनीत पार्टीसाठी बोलवले. तिथे दारू पार्टी सुरु असताना पुन्हा नबी आणि सोनूमध्ये वाद सुरु झाला.त्यामुळ वादात दोन्ही बाजूंनी शस्त्र निघाली. नबी हल्ला करण्यापूर्वी सोनू आणि रशीदनं नबीवर चाकू आणि तलवारीनं वार करत हत्या केली.त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात टाकला आणिकन्हान नदीत फेकला. दोन दिवसानंतर नबीचा मृतदेह पाण्याबाहेर आल्यानंतर हत्या झाल्याचं समोर आलं.त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर याप्रकरणाचा उलगडा झाला. यशोधरानगर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली.

 

दाभा परिसरात सहकारा-याने केली हत्या

दरम्यान यशोधरानगर पोलिस स्टेशनच्या गुंड नबीच्या हत्येचा उलगडा होत नाही तोच दाभा परिसरात रविवारी सकाळी अजून हत्येची घटना उघडकीस आली. राजू नंदेश्वर ( वय 35 , बालाघाट )  असं मयताचं नाव आहे.टॉमीनं वार करत सहका-यानेच त्याची हत्या केली. देवांश वाघोडे असं मारेक-याचे नाव आहे. दोघेही एकाच गॅरेजमध्ये काम करायचे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x