पुण्यात हँडग्रॅनेड सदृश्य वस्तू सापडली

पुण्यात हँडग्रॅनेड सदृश्य वस्तू सापडली 

Updated: Nov 1, 2019, 11:16 PM IST
पुण्यात हँडग्रॅनेड सदृश्य वस्तू सापडली title=

पुणे : पुण्यात हँडग्रॅनेड सदृश्य वस्तू सापडली आहे. ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर ही वस्तू सापडली आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली. लष्कराला ही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान नष्ट केलेल्या हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तूचे अंश पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं मुख्य कार्यालय आहे. येथील पादचारी पुलाशेजारील पार्किंगच्या मगे एका सफाई कर्मचाऱ्याला ही वस्तू दिसली. त्यानं तातडीनं या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली.