बिअर बारसमोर 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' फलक लावणं बंधनकारक, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

आता प्रत्येक बिअर बारसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असा फलक लावणं बंधनकारक असणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.

Updated: Jan 8, 2024, 11:09 PM IST
बिअर बारसमोर 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' फलक लावणं बंधनकारक, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना  title=

Tanaji Sawant : आता प्रत्येक बिअर बारसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असा फलक लावणं बंधनकारक असणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याला याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. 

सध्याच्या स्पर्धेच्या युगात अपयशी ठरल्यानंतर तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक बियर बार समोर 'आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे' अशा आशियाचे फलक लावा अशा सूचना राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

धाराशिव शहरातील नवीन 50 बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामाचे डॉक्टर सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी केलेल्या नवीन वक्तव्याचे कसे पडतात हे पाहाव लागेल. 

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा

पुण्यात मद्यधुंद तरुणीनं राडा घातलाय. वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत दारुच्या नशेत मुलीनं गोंधळ घातलाय. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडलीय. नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद केलं आणि राडा घातला...सोसायटीतील रहिवाश्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं. मात्र, या तरुणीनं महिला पोलिसांना देखील मारहाण केली...तसेच सोसायटीच्या मालमत्तेचीही तोडफोड केल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं. मात्र, ही तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आल्याचं सोसायटीतील रहिवाशांनी म्हटलंय

दूध-कोल्ड्रींगच्या दुकानातच बिअर बार 

हॉटेलमध्ये किंवा धाब्यांवर अवैधपणे दारूविक्री होत असल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र नाशिक जिल्ह्यात चक्क दूध-कोल्ड्रींगच्या दुकानातच बिअर बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झी 24 तासच्या इन्स्वेस्टीगेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.  इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद गावातील गजनान दूध डेअरीत  रोजरोजसपणे दारूविक्री सुरु होती. 

पालघरमध्ये बिअर देण्यास नकार दिला म्हणून हॉटेलमध्ये राडा

पालघरमध्ये बिअर देण्यास नकार दिला म्हणून हॉटेलमध्ये राडा घातला गेला. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं कर्मचा--यांना मारहाण केलीय. पालघर मधील जुना पालघर परिसरातील अभिषेक हॉटेल अँड बारमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण असा राडा झाला. मॅनेजरसह पाच वेटरला दगड , काठ्या आणि बियरच्या रिकाम्या बॉटल यांनी मारहाण केली असून मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.