डोंबिवलीः बायकोने आईची बाजू घेतली, मुलाला राग आला, पत्नीचा गळा आवळला अन्...
Husband Tries To Kill Wife: डोंबिलतील जमिनीच्या वादातून पतीनेच पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Husband Tries To Kill Wife over property dispute in dombivali
आतिष भोईर, झी मीडिया,
Husband Tries To Kill Wife In Dombivali: मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीवर (Mumbai Hostel Crime News) अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर डोंबिवलीतही पतीनेच जमिनीच्या वादातून पत्नीला जीवे मारण्याचा (Husband And Wife News) प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. (Crime News In Dombivali)
डोंबिवलीच्या (Dombivali) भोपर भागात जमिनीच्या वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष म्हसकर असं या आरोपीचे नाव असून या प्रकरणी आरोपी संतोषला मानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. व या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
जमिनीच्या पैशावरुन वाद
मंगळवारी ही घटना घडली आहे. संतोषच्या आईने तिच्या माहेरकडील जमिनीचा हिस्सा विकला होता. त्याचे त्यांना पैसेही आले होते. आईला मिळालेले पैसे मिळावे यासाठी संतोषने तिच्यामागे तगादा लावला होता. मात्र आई त्याला पैसे देण्यास नकार देत होती.
आरोपीला दारूचे व्यसन
संतोष याला दारूचे व्यसन असल्याने त्याची आई त्याला पैसे देणं टाळत होती. याच मुद्द्यावरून संतोष आणि त्याची पत्नी सुहासिनी यांच्यात वाद झाला. दारु पिता तर पैसे कशाला हवेत. आपल्याला त्यांचे पैसे नको असे सुहासिनीने संतोषला सांगितले. त्यांच्यातील वाद वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात संतोषने तिला शिवीगाळ करत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
शेजाऱ्यांनी केली सुटका
सुहासिनीने आरडा-ओरडा करताच शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतोषच्या तावडीतून सुहासिनीची सुटका केली आणि तिचा जीव वाचला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपी संतोषला अटक केली आहे.
मुंबई होस्टेलमध्ये तरुणीची हत्या
मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावित्रीबाई फुले महिला वस्तीगृहात हा प्रकार घडला असून पोलिसांनी मृतदेह उत्तर तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक ओम प्रकाश कनोजिया हा फरार होता त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच त्याचा पण मृतदेह काल चर्नी रोड आणि ग्रांट रोड स्थानकादरम्यान सापडला. मरिन ड्राइव्ह पोलीस याचा तपास करत आहे. ही विध्यार्थिनी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती असून ती इंजिनीअरिंगला शिकत होती.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link