Bank Of Maharashtra Recruitment : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने (Bank Of Maharashtra) 551 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार या रिक्त पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofmaharashtra.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 2023 -2024 या वर्षासाठी श्रेणी II आणि III च्या पदासांठी बँक ऑफ महाराष्ट्रने नोंदणी सुरु केली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती?
यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या भरतीत मुख्यतः श्रेणी II आणि III मध्ये 225 विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहे. यामध्ये अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, कायदा अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठ भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
अर्थशास्त्रज्ञ पदासाठी (Economist) 2 जागा रिक्त असून यासाठी शैक्षणिक पात्रता अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आवश्यक असून 2 ते 5 वर्षे अनुभव आवश्यक असणार आहे.
सुरक्षा अधिकारी पदासाठी (Security Officer) 10 जागा रिक्त असून यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी हवी असणार आहे. तर 2 ते 10 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
स्थापत्य अभियंता पदासाठी (Civil Engineer) 3 जागा रिक्त असून मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक असणार आहे. यासाठी 3 ते 5 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
कायदा अधिकारी पदासाठी (Law Officer) 10 जागा रिक्त आहेत. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी आवश्यक असून 7 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी (Business Development Officer) 50 जागा रिक्त असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर/ एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए/ पीजी पदवी अशी आहे. तर यासाठी 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
विद्युत अभियंता पदासाठी (Electrical Engineer) 2 जागा असून त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी आवश्यक असणार आहे. तर उमेदवाराकडे 3 वर्षे अनुभव असायला हवा.
राजभाषा अधिकारी पदासाठी (Rajbhasha Officer) 15 जागा रिक्त असून यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. यासोबत त्याला 3 वर्षे अनुभव असावा.
एचआर/ कर्मचारी अधिकारी पदासाठी (HR/Personnel Officer) 10 जागा रिक्त आहेत. त्यासाठी उमेदवाराकडे पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी असायला हवी. तसेच त्याच्याकडे 3 वर्षे अनुभव असायला हवा.
आयटी विशेषज्ञ अधिकारी पदासाठी (IT Specialist Officer) 123 जागा रिक्त असून उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.टेक. / बी.ई./ एमसीए / एम.एस्सी पूर्ण केलेले असावे.
नोकरीचे ठिकाण आणि वयोमर्यादा
नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे तर 31 ऑक्टोबर 2022 रोजी सदर अर्जदाराचे वय 21 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] असायला हवे.
परीक्षा फी – 1180/- रुपये (SC/ST/PWD – 118/- रुपये)
मिळणारे वेतन – 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये महिना
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे Click करा – APPLY